वैजापूर, (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त वैजापूर येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आयुष्यभर लढा दिला. सामान्य शिवसैनिकाला ताकद देण्याचे काम बाळासाहेबांनी केले. त्यांचे विचार, त्यांची वाणी आणि त्यांचा
बाणा आजही प्रत्येक शिवसैनिकाला प्रेरणा देतो.
मराठी माणूस मुंबईत, महाराष्ट्रात स्वाभिमानाने उभा राहिला तो केवळ बाळासाहेबांमुळे. त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हेच खरे अभिवादन ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, मनोज गायके, मनाजी पाटील मिसाळ, ऍड रमेश पाटील सावंत, शिवसेना पदाधिकारी, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते व वैजापूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.













